…म्हणून काजोलने त्यांच्या लग्नाचा चुकीचा पत्ता देऊन मीडियाची दिशाभूल केली !

922

बॉलीवूड इंडस्ट्री मधली प्रसिद्ध अभिनेत्री काजोल जितके तिच्या कामासाठी चर्चांमध्ये असते तितकेच तिच्या शरारती, मजेदार स्वभावासाठी सुद्धा असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द कपिल शर्मा शो या कार्यक्रमांमध्ये तिने तिची एक जुनी आठवण सांगितली.
या आठवड्यात न कपिल शर्मा शो चा महिला दिन विशेष भाग प्रदर्शित झाला. या आठवड्यात द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामध्ये महिला दिन विशेष देवी या शॉर्ट फिल्म मधील ९ अभिनेत्री पाहुण्या म्हणून आल्या होत्या. यामध्ये काजोल सोबत श्रुती हसन नेहा धुपिया नीना कुलकर्णी मुक्ता बर्वे शिवानी रघुवंशी संध्या म्हात्रे रमा जोशी यशस्विनी दयामा या आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या फॉरमॅट नुसार कपिल कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्यांच्या आयुष्याशी निगडीत अफवांबद्दल विचारतो.
यावेळी कपिलने काजोलला तिच्या लग्नाच्या अफवेबद्दल विचारले. कपिल ने विचारले की त्यावेळी अशी अफवा होती की तुम्ही तुमच्या लग्ना वेळी मिडीयाला चुकीचा पत्ता दिला होता हे खरं आहे का ? यावर काजोलने हसतहसत हा असे उत्तर दिले. ती बोली की मी त्यावेळी मिडीयाला चुकीचा पत्ता दिला होता. आणि तसे करणे जरुरी होते. जर मी त्यावेळी त्यांना चुकीचा पत्ता सांगितला नसता तर आमचे लग्न कुठे आहे याचा पत्ता शोधत ते तिथे आले असते.‌ म्हणून मीच डोक्याचा लावले आणि त्यांना स्वतःहून पत्ता दिला पण तो चुकीचा. जेणेकरून त्यांना जोपर्यंत खरा पत्ता समजेल तोपर्यंत आमचे लग्न झालेले असेल.
कपिलने कार्यक्रमांमध्ये अजून एका अफवेबद्दल काजोलला विचारले की हे खरे आहे का किती तिच्या आईमुळे अभिनेत्री बनली? काजोलला तिच्या आयुष्यातील पहिले दोन चित्रपट तिच्या आईमुळे म्हणजेच तनुजा मुळे मिळाले. यावर काजोल म्हणाले की हे साफ खोटे आहे. माझ्या आईने मला नेहमीच मदत केली आणि मला योग्य ते मार्गदर्शन केले आहे.
द कपिल शर्मा शो यामध्ये देवी या शॉर्ट फिल्मच्या प्रमोशनच्या निमित्त नऊ अभिनेत्री जमल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडून समजले की या शॉर्ट फिल्मसाठी सर्व नऊ अभिनेत्रींनी बिना फि घेता काम केले आहे. आणि आपापली भूमिका एकदम झोकून निभावली आहे. काजोलचा जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेला तानाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगलाच गाजला. या चित्रपटाने 300 करोडचा टप्पा पार केला.