जेनेलिया वहीनी जेव्हा शाकाहारी होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काय झालं, जाणून घ्या !

4205

अभिनेत्री जेनलिया डिसूझा ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. रोज वेगवेगळे फोटो किंवा व्हिडीओ ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट करत असते. नुकतेच जेनेलियाने काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये शेत आणि त्या शेतात जांभळ्या-पांढऱ्या रंगाचे कोबी दिसत आहे. तसेच शाकाहारी झाल्यावर जेनेलियाला कसे वाटते याबद्दल सुद्धा तिने सांगितले.‌
जेनेलियाने तिच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, काही वर्षांपूर्वी मी शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला, खरे सांगायचे झाल्यास सुरुवातीला आधी हे मला थोडे कठीण वाटले होते मात्र मी ते कटिबद्धतेने करण्याचा निर्णय घेतला. माझ्या सहकारी बनवण्याच्या प्रवासात मी झाडाझुडपांचे सौंदर्य न्याहाळले. खूप रंगांना प्रत्यक्षात पाहिले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मनातील प्राण्यांबद्दलची क्रूरता पहिल्या हून खूपच कमी झाली आहे. जेनेलिया आणि पुढे लिहिले आहे की मी माझ्या सासू च्या मदतीने त्यांनी लावलेल्या जैविक शेती मधून हे सुंदर कोबी उगवले आहेत. आम्ही रोज कोशिंबिरीचा रुपात रोज हे कोबी खात असतो. पण आज मी या कोबीचे सूप बनवण्याचे ठरवले आहे. हे सर्व माझ्या सासूबाईंमुळे शक्य झाले.
त्यांच्यामुळे मला नैसर्गिक रंगांची ओळख झाली. आज मी सुंदर वांगी कलर त्यांच्यामुळे पाहू शकते. माझा हा रविवार रंगांनी भरल्याबद्दल आई मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. फक्त जेनेलिया नव्हे तर तीचा पती म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख सुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.
रितेश अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर विनोदी व्हिडिओ पोस्ट करत असतो. काही दिवसांपूर्वीच रितेश-जेनेलियाचे पाय दाबून देताना दिसला होता. एकमेकांची काळजी घेणे आणि एकमेकांना मदत करणे हेच त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्याचा सिक्रेट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
जेनेलियाने २००३ मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. तिने हिंदी, तेलगू , कन्नड,तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेनेलियाला तिचा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड २००६ मध्ये एका तेलगू चित्रपटासाठी मिळाला होता. जेनेलिया बॉईज, मस्ती, तेरे नाल लव हो गया, जाने तू या जाने ना या चित्रपटांमध्ये दिसली होती. तिने वयाच्या पंधराव्या वर्षी मॉडेलिंगच्या सुरुवात केली होती. जेनेलिया आणि रितेश देशमुख ची जोडी बॉलिवूडमधील परफेक्ट कपल मानले या दोघांनी २०१२ मध्ये विवाह गाठ बांधली. आता या दोघांना रियान आणि राहील ही दोन मुले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !