बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये शेवटचा श्वास घेतला. इरफान खान यांनी त्यांच्या बहारदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. त्यांचा चाहता वर्ग हा केवळ भारतापुरताच मर्यादित नसून तो संपूर्ण जगभर पसरला आहे. त्यांनी हिंदी चित्रपटांतसोबतच हॉलीवूड मध्ये देखील काम केले होते.
तसे पाहायला गेले तर करिअरची सुरुवात ही इरफान खान यांनी छोट्याशा भूमिकेपासुनच केली होती. आज ते जिथे होते तिथपर्यंत पोहोचण्याचे श्रेय हे फक्त त्यांच्या मेहनतीला जाते. रिपोर्टनुसार त्यांची त्यांच्या पत्नीसोबत ओळख ही ड्रामा स्कूल मध्ये झाली होती. काही दिवसांच्या मैत्रीतच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर १९९५ मध्ये दोघांनी लग्न केले.
त्यांच्या पत्नीचे नावं सुतापा सिकंदर आहे. तसेच इरफान खान यांना दोन मुले आहेत यातील एकाचे नाव बाबिल तर दुसऱ्या मुलाचे नावं आयान असे आहे. इरफान खान व त्यांची पत्नी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे विद्यार्थी होते. तेथेच या दोघांची ओळख होऊन त्याचे प्रेमात रुपांतर झाले होते.
पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी इरफान खान यांनी स्कॉलरशिप साठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अप्लाय केला होता नंतर मंजूर झाला. दिल्ली येथील ॲक्टींग कॉलेज मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला आले. सुरुवातीच्या काळात करिअरमध्ये जम बसवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. आधी टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी छोटे-मोठे रोल सुद्धा केले होते. त्यांनतर २००१ मध्ये त्यांचे नशीब पालटले आणि मग आपण सर्वांनीच त्यांना वेगवेगळ्या भूमिका रंगवताना पाहिलं आहे. प्रत्येकाने त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक केले.
अनेक मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे की जर इरफान खान फिल्म इंडस्ट्रीमध्ये नसते तर कदाचित ते एक क्रिकेटर असते. लहानपणापासूनच क्रिकेटर बनावे अशी त्यांची इच्छा होती. गंमत म्हणजे चित्रपटात काम करावे असे त्यांनी कधी स्वप्नातदेखील पाहिले नव्हते. पण बोलतात ना नशिबात जे लिहिलेले असते तेच घडते. इरफान खान यांच्या बाबतीतही अगदी तसेच झाले म्हणूनच ते क्रिकेटर न होता फिल्मी दुनियेत आले. एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी स्वतःची ओळख तयार केली. इरफान खान वेगवेगळ्या प्रकारची भूमिका सहजरीत्या साकारू शकायचे.
अभिनय ही इरफान खान यांची ताकद होती. त्यामुळेच ते एका चित्रपटासाठी १२ ते १४ करोड रुपये इतकी फी घ्यायचे. मुंबई मध्ये एका फ्लॅट मध्ये ते कुटुंबासोबत राहायचे. अंग्रेजी मिडीयम हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ज्यामध्ये ते करीना कपूर सोबत दिसले होते.