इंडियन आयडल शो दरम्यान एका कंटेस्टंटचा नेहा कक्कडला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न !

458

हल्ली टेलिव्हिजन विश्वात अनेक रियालिटी शो ची चलती आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंगिंग शोज खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. हे रियालिटी शोज टीआरपी मध्ये सुद्धा खूप वरचढ असतात. आता या रियालिटी शो मध्ये आणखी एका सिंगिंग भर पडणार आहे. आम्ही बोलत आहोत ते म्हणजे सुप्रसिद्ध सिंगिंग शो इंडियन आयडल बद्दल. इंडियन आयडल चे आतापर्यंत १० सीजन आले. आणि हे सर्व १० सीजन सुपरहिट ठरले. या शोच्या प्रसिद्धीचा विचार करून इंडियन आयडल चा निर्मात्यांनी इंडियन आयडल सीजन ११ लॉन्च करण्याचे ठरवले. या शोचा शुभारंभ नेहा कक्कड ने देवाची पूजा व आरती करून केला.
इंडियन आयडल मध्ये यावेळी परीक्षक म्हणून नेहा कक्कड व्यतिरिक्त विशाल ददलानी आणि अनु मलिक दिसतील. काही दिवसांपासून या शोचे प्रोमोज् टीव्हीवर सारखे झळकत आहेत. हल्लीच्या शो चा आणखी एक प्रोमो लॉन्च करण्यात आला. या प्रोमो मध्ये स्पर्धेतील कंटेस्टंट परफॉर्म करताना दिसतात आणि त्याच बरोबर आणखीन एक गोष्ट दिसते ती सर्वांना चकित करून जाते.
या शोमधील सर्वच स्पर्धक त्यांच्या मनमोहक सुरांनी प्रेक्षकांना घायाळ करून टाकत असतात. परंतु या सेटवर एक भलतीच घटना घडली. या मध्ये एक व्यक्ती नेहाला किस करण्याचा प्रयत्न करत असतो. या व्हिडीओ मध्ये असे दिसते की एक कंटेस्टंट नेहासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन स्टेजवर येतो आणि एकेक करून सर्व गिफ्ट नेहाला देतो. गिफ्ट घेतल्यानंतर नेहा त्या व्यक्तीला मिठी मारते परंतु तेव्हा तो कंटेस्टंट तिच्या गालावर किस करतो. त्यानंतर नेहा तिचा चेहरा लपवून तेथून निघून जाते.
हा सर्व प्रकार बघितल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सर्व जण हैराण होऊन जातात. परंतु या पुढे काय होते हे बघण्यासाठी संपूर्ण एपिसोड बघावा लागेल. परंतु या प्रोमाच्या व्हिडिओ मधून तरी साप असेच दिसून येते की तो कंटेस्टंट नेहाला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न करीत असतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सर्वच लोक उत्सुकतेने बघत आहेत. या व्हिडिओचे चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. आता या शोमधून त्या कंटेस्टंट ला काढून टाकण्यात येईल की अजून काही ? त्याचबरोबर परीक्षकांची यासर्व घटनेवर काय रिऍक्‍शन असेल हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.