इंडियन आयडॉल ग्रँड फिनाले दरम्यान ढसाढसा रडला हिमेश रेशमिया !

340

छोट्या पड्यावरील लोकप्रिय रियालिटी शो इंडियन आयडल सिजन ११ चा आज ग्रँड फिनाले आहे. यामुळेच प्रेक्षकांमध्ये या सीजनचा विजेता कोण होणार यावरून उत्सुकता वाढीस लागली आहे. या शो चे परीक्षक नेहा कक्कड , हिमेश रशमिया , आणि विशाल दादलानी यांना सुध्दा विजेता कोण होणार यासाठी उत्सुकता लागली आहे.इंडियन आयडॉल सीजन ११ च्या ग्रँड फिनाले साठी या शो चे निर्माते व संपूर्ण टीम सुद्धा खूप मेहनत घेत आहे. यातच या शो संबंधित एक व्हिडीओचा प्रोमो समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये हिमेश रशमिया जोरजोरात रडताना दिसत आहे.
सोनी टेलिव्हिजन ने चॅनलच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंट वरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सीजन ११ च्या ग्रँड फिनाले संबंधित आहे. यात फायनलला पोहोचलेले टॉप ५ कंटेस्टेंट्सने त्यांच्या आवडत्या परीक्षकांसाठी खास परफॉर्मन्स सादर केला आहे. या प्रोमो मध्ये कंटेस्टंट परीक्षकांचे कौतुक सुद्धा करताना दिसतात. त्यावेळी या शो मधील कंटेस्टेंटस असलेली अंकोना मुखर्जी राणू मंडल चे तेरी मेरी कहानी हे गाणे गाते त्यावेळी हिमेश राशमिया खूप रडताना दिसतो. या प्रोमो मध्ये अंकोना हिमेश रशामिया ने दिलेल्या प्रशिक्षणा बद्दल त्याचे आभार मानते आणि त्याच्यासाठी खास तेरी मेरी कहानी हे गाणे म्हणते. हे गाणे ऐकून हिमेश खूप भाऊक होतो आणि रडू लागतो.
या प्रोमो मध्ये नेहा कक्कड सुद्धा रडताना दिसते. इंडियन आयडॉल सीजन ११ शी संबंधित हा प्रोमो इंटरनेट वर सध्या खूप व्हायरल होत आहे. गेल्यावर्षी राणु मंडल देखील इंटनेट वर रातोरात स्टार झाली होती.
पश्चिम बंगाल येथील रानाघाट रेल्वे स्टेशन वर राणू मंडल यांचा गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाली होती. त्यानंतर तिचे नशीब अचानक उजळले. या एका व्हायरल व्हिडिओ ने रानू मंडल यांना बॉलिवुड पर्यंत पोहोचवले. हिमेश राशमियासोबत म्युझिक अल्बम मध्ये रेकॉर्डिंग केले.
इंडियन आयडॉल च्या विजेत्या पदासाठी शर्यतीत भातींडाचा सनी हिंदुस्तानी, लातूर हून रोहित राऊत, मुलींमधून एकमेव कंटेस्टंट अंकोना मुखर्जी , अमृतसर वरुन रिधम कल्याण आणि अदरिज घोष यांचा समावेश आहे.