रामायणातील सुमंत यांचा नातू आहे हा सुप्रसिद्ध अभिनेता, सध्या करतो टीव्ही सिरीयलमध्ये काम !

720

सध्याच्या कोरोना व्हायरस मुळे लॉक डाऊन करण्यात आले असून टिव्ही वरील सर्व मालिकांचे शूटिंग थांबवले आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी ८० च्या दशकातील लोकप्रिय मालिका रामायण ही प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला आली असून सध्या सर्वत्र याच मालिकेची चलती आहे. या लॉक डाऊन मध्ये रामायण मालिकेने टी आर पी चे सर्व रेकॉर्ड मोडले. सध्याच्या काळात प्रत्येक प्रेक्षक रामायण बघणे पसंत करतो. एवढेच नव्हे तर हे प्रेक्षक मालिके सोबतच मालिकेच्या पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा उत्सुक असतात.
त्याकाळात रामानंद सागर यांच्या रामायणातील कलाकारांना एवढी प्रसिद्धी मिळाली होती की लोक त्यांना खरेखुरे परमेश्वर मानून त्यांची पूजा करायचे. मालिकेत राम, लक्ष्मण आणि सीता ची भूमिका साकारणारे अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया यांना त्यावेळी लोक साक्षात खरेखुरे राम-लक्ष्मण-सीता मानायचे. याच मालिकेत अजून एक पात्र होते ते म्हणजे सुमंत. मालिकेतील सुमंतचे खरे नाव चंद्रशेखर वैद्य आहे.
चंद्रशेखर हेसुद्धा फिल्मी दुनियेतील एक दिग्गज कलाकार मानले जायचे. विशेष म्हणजे त्यांचा नातू सुद्धा सध्या एक मोठा अभिनेता आहे. टीव्ही मालिकांमध्ये स्वतःचे नाव वेगळे नाव कमावलेला अभिनेता शक्ती अरोडा हा रामायणातील सुमंत म्हणजे चंद्रशेखर यांचा नातू आहे. शक्तीने तेरे लिये, मेरी आशिकी तुमसे ही, आणि पवित्र रिश्ता यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते.

हे वाचा – आपल्या अभिनयाने रामायण मध्ये लोकांना रडवणारे भरत आज या कारणामुळे नाहीत आपल्या सोबत !रामायणात सुमंत हे महाराज दशरथ राजाचे महामंत्री होते. या मालिकेत चंद्रशेखर यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. शिवाय चंद्रशेखर यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये लहान-मोठे रोल साकारले आहेत. त्यांनी १९५४ मध्ये औरत तेरी एक कहानी या चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. चंद्रशेखर यांना बालपणी खूप गरीब परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्यांनी भारत छोडो आंदोलनांमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता.

हे वाचा – राम आणि रावण यांची मैत्री सोशल मीडियावर गाजत आहे, काय आहे प्रकरण जाणून घ्या !मुंबईत आल्यावर चंद्रशेखर वैद्य हे कोरस सिंगर बनले. याच काळात त्यांना रामानंद सागर यांनी सुमंत ही भूमिका ऑफर केली. जेव्हा त्यांना रामायणात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा ते ६५ वर्षांचे होते. चंद्रशेखर वैद्य यांनी सुरंग, बरसात की एक रात, कटी पतंग, शराबी आणि शक्ती यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. शक्तीचे त्याच्या आजोबांसोबत खूप जवळचे नाते आहे. शक्तीने याआधीही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्याच्या आजोबांसोबत चा फोटो शेअर केला होता.

हे वाचा – रामायणातील या ५ कलाकारांनी घेतला आहे जगाचा निरोप, पहा आणखी कोण आहेत !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !