मिथुन चक्रवर्ती यांच्या त्या त्यागामुळे, सनी देओल ठरला त्या काळचा सुपरस्टार !

९० च्या दशकात बॉलीवूड मध्ये ॲक्शन हिरो म्हणून कोणाला ओळखले जात असेल तर तो म्हणजे सनी देओल. तो काळ असा होता जेव्हा मोठमोठे दिग्दर्शक सनी देओल ला त्यांच्या चित्रपटांमध्ये घेण्यासाठी सनीच्या घरी चक्कर मारायचे. सनी देओलने बेताब हि सुपरहिट चित्रपट केला आणि त्यानंतर त्याच्याकडे त्याला चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शकांची रांग लागली.
मात्र सनी देओल च्या आयुष्यात एक असाही काळ होता जेव्हा कोणतेही दिग्दर्शक त्याला चित्रपटात घेण्यास तयार नव्हते. कारण बेताब चित्रपटानंतर सनी देओलचे लागोपाठ दहा चित्रपट झाले. या दहा चित्रपटांमध्ये अर्जुन, सल्तनत, यतीम, डकैत यांसारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश होता.
सनी देओलला मिळणाऱ्या या लागोपाठ अपयशामुळे सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांना त्याची खूप काळजी वाटू लागली होती. त्यावेळी धर्मेंद्र आणि त्यांच्या ओळखीच्या कॉन्टॅक्ट मधून सनीला चित्रपट मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोणतेच दिग्दर्शक रिस्क घेण्यास तयार नव्हते. काही दिवसांनी धर्मेंद्र यांना राजकुमार संतोषी यांना नव्या दिग्दर्शकाची माहिती मिळाली. त्यावेळी राजकुमार संतोषी एका चांगल्या स्क्रिप्टवर काम करत होते. त्यावेळी धर्मेंद्र स्वतः जाऊन राजकुमार संतोषी यांना भेटले.
मात्र राजकुमार संतोषी यांनी सुद्धा धर्मेंद्र यांना मदत करण्यास नकार दिला. कारण धर्मेंद्रंनी विचारायच्या आधीच राजकुमार संतोषींनी त्या चित्रपटासाठी त्याकाळचे सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांना साइन केले होते. आता धर्मेंद्र यांच्याकडे एकच रस्ता उरला होता तो म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांना मनवायचा. त्यामुळे हा विचार करून धर्मेंद्र मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे गेले आणि त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगितली. मिथुन चक्रवर्ती धर्मेंद्र यांची खूप इज्जत करायचे. त्याला खूप मानायचे. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांनी मोठ्या मनाने स्वतःला राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटांमधून वेगळे केले.
यानंतर राजकुमार संतोषी आणि या चित्रपटात सनी देओलला घेतले. या चित्रपटाने यशाची नवी शिखरे गाठली. या चित्रपटाला अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. या चित्रपटाचे नाव होते ‘घायल’. या चित्रपटात सनी देओल सोबत राज बब्बर, अमरीश पुरी, मनीषा शेषाद्री, अनु कपूर, ओम पुरी आदी कलाकार सुद्धा होते. त्याकाळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १७ कोटींची कमाई केली.