एका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण !

876

काही वेळेस असे वाटते की जैकलीन फर्नांडिस ला वादविवादात राहणे खूप पसंत आहे. पण तुम्हाला खोटे वाटेल तिच्या या अशा वाद-विवाद राहण्यामुळे यशाची शिखरे गाठू शकली आहे ! तिने आजपर्यंत जितके मिळवले ते कुठल्या ना कुठल्या वादात राहूनच मिळवले असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र वाद हे नेहमी फायदा करून देतात असे काही काही वेळा मोठे नुकसान होण्याची शक्यता सुद्धा असते. याचा अनुभव जॅकलीनला चांगला आला आहे. तिच्या एका आयटम सॉन्ग मुळे शिख संघटनेने तिला तिचा जीव घेण्याची धमकी दिली होती .
हे वाचा – या भारतीय क्रिकेटरचे करियर झाले फ्लॉप पण नशिबाने झाले राजकुमारी सोबत लग्न !
२०१६ मध्ये जॅकलीनने रोहित धवनच्‍या डिशुम या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत वरूण धवन आणि जॉन अब्राहम हे अभिनेते सुद्धा होते. या चित्रपटातील जॅकलीनने एका आयटम सॉन्ग वर डान्स केलेला होता. हा डान्स करताना तिने एक छोटा स्कर्ट घातलेला आणि त्यावर कृपाण बांधलेले. तिचा तो गेट ऑफ डबल मीनिंग तयार करत होता असे काहींचे म्हणणे आहे.
जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा शीख संघटनेने खूप गोंधळ निर्माण केला. छोट्या स्कर्ट वर कृपाण घालणे हे शिखांच्या धार्मिक भावनेला ठेच पोहोचवणारे होते. त्यामुळे शिख संघटनेने या गाण्यावर आक्षेप घेत खूप गोंधळ केला होता. एवढेच नव्हे तर हे गाणे चित्रपटातून काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केली तसेच जॅकलीनने लेखी माफीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा केली होती.
हे वाचा – हि सुंदर मुलगी आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल ! 
जॅकलीन ला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे जॅकलीने पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली पण मुंबई पोलिसांनी ती मागणी स्वीकारली नाही. त्यामुळे सतत येणाऱ्या धमक्यांना कंटाळून जॅकलीन परदेशात निघून गेली आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर परत आली.
शीख संघटनेच्या दबावाखाली येऊन सेंसॉर बोर्डने ते गाणेच नव्हे तर चित्रपटातील काही सीन सुद्धा कापून टाकले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हवे तसे यश मिळवू शकला नाही.

हे वाचा – या आहेत साऊथ कडील श्रीमंत आणि प्रसिद्ध अभिनेत्री, वाचून थक्क व्हाल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !