का जगापासून स्वतःचे आडनाव लपवतात हे ७ कलाकार, जाणून घ्या !

2193

कोणत्याही व्यक्तीची ओळख ही त्याच्या नावावरून आणि आडनावावर होते. परंतु काही बॉलीवूड मधील कलाकार हे त्यांचे आडनाव लपवताना दिसतात. तसे बघायला गेले तर बॉलिवूडमध्ये स्वतःचे खरे नाव बदलण्याची परंपरा ही खूप जुनी आहे. बॉलिवुड मधील अनेक दिग्गज कलाकारांनी बॉलिवुड मध्ये येण्यापूर्वी त्यांचे खरे नाव बदलले होते.
यामध्ये मनोज कुमार, दिलीप कुमार यांसारखे अनेक कलाकार होते. परंतु यांच्या सारखेच आणखी असे ही काही कलाकार आहेत ज्यांनी त्यांचे नाव तर बदलले परंतु त्यासोबतच स्वतःचे आडनाव जगापासून लपवून ठेवले. या कलाकारांना त्यांच्या नावापाठी आडनाव लावणे आवडत नाही. यामध्ये गोविंदा, धर्मेंद्र, जितेंद्र यांसारखे कलाकार आहेत. आज आम्ही तुम्हाला हे कलाकार त्यांचे आडनाव का लावत नाहीत याचे कारण सांगणार आहोत.
१) गोविंदा – बॉलिवुडचा चुलबुला अभिनेता गोविंदाला तर सर्वच जण पसंत करतात. परंतु त्याच्या संपूर्ण नावाबाबत खूप कमी लोकांना ठाऊक आहे. गोविंदा यांचे पूर्ण नावं गोविंदा आहुजा असे आहे. त्यांचे नाव छोटे असावे व ते लोकांच्या कायम लक्षात रहावे यासाठी ते त्यांच्या नावा पाठी आडनाव लावत नाही असे त्यांनी सांगितले.
२) आसिन – गजनी या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आसींन ला सर्वच ओळखतात. तिचे संपूर्ण नावं आसीन थोट्टुमकल असे आहे. हे नाव लक्षात ठेवणे थोडे कठीण आहे त्यामुळेच आसीन कधीच तिचे पूर्ण नावं लावत नाही.
३) रेखा – रेखाला संपूर्ण जग ओळखते. जसजसे वय वाढत चालले आहे तसतसे तिचे सौंदर्य अजून खुलत चालेले आहे. आज संपूर्ण देशात तिचे अनेक चाहते आहेत. परंतु तिचे संपूर्ण खरे नावं हे फारच कमी लोकांना माहिती असेल. रेखाचे खरे संपूर्ण नावं आहे भानुरेखा गणेशन. हे नाव खूप मोठे असल्याने ते छोटे रहावे म्हणून ती तिचे पूर्ण नावं लावत नाही.
४) तमन्ना – साऊथ व बॉलिवुड मध्ये आपल्या घायाळ अदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणऱ्या तमन्ना चे संपूर्ण नावं आहे तमन्ना भाटिया. तसे तिचे आडनाव सर्वानाच ठाऊक आहे मात्र तमन्ना चा न्युमरोलोजी वर खूप विश्वास आहे त्यामुळे ती तिचे आडनाव लावत नाही.
५) काजोल – ९० च्या दशकात बॉलिवुडची टॉप ची अभिनेत्री असलेली काजोल तिचे पूर्ण नाव कुठेच लावत नाही. काजोल चे संपूर्ण नावं काजोल मुखर्जी असे आहे. तिच्या परिवारातील काही वयक्तिक भांडणामुळे तिने तिचे आडनाव लावणे सोडले होते.त्यामुळे हे भांडण किती टोकाचे असेल याची कल्पना आपण करू शकतो.
६) तब्बू – बॉलिवुडची सुंदर अभिनेत्री तब्बूने बॉलिवुड मध्ये स्वतः ची वेगळी अशी जागा तयार केली आहे. तब्बुचे संपूर्ण नावं तब्बसूम हाश्मी असे आहे. तिचे नावं तिला खूप मोठे वाटायचे त्यामुळे छोटे नावं असावे या इच्छे खातर तिने तिचे नावं तब्बू इतकेच ठेवले.
७) शान – स्वतःच्या आवाजाची जादू रसिकांच्या मनावर करणाऱ्या शान चे संपूर्ण नावं शांतनू मुखर्जी असे आहे. लोकांना आपले नाव पटकन आठवावे व ते कायम लक्षात राहवे यासाठी त्याने स्वतःचे नाव शान इतकेच ठेवले.