सध्या सर्वत्र कोरोना व्हायरासचे सावट पसरले आहे. जो तो आपल्यापरिने कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करीत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊन केला. जेणेकरून कुठेतरी कोरोनाव्हायरस चे संक्रमण मोडले जाईल. मोदींनी सर्व देशवासीयांना अपील केले आहे की प्रत्येकाने घराच्या बाहेर पडू नये घरातच रहावे आणि सुरक्षित रहावे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कलाकार सुद्धा स्वतःला घरात बंद ठेवत आहेत. तर या कठीण वेळी काही बॉलीवूड कलाकार स्वतःहून मदतीचा हात पुढे करीत आहेत.
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खान ज्याप्रमाणे स्वत:चा अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना प्रेमात पडायला भाग पाडतो त्याचप्रमाणे कठीण प्रसंगी गरजू लोकांना मदत करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करतो. आता सलमान खान ने २५००० कर्मचाऱ्यांना जे रोजंदारीवर काम करतात अशांना आर्थिक स्वरूपात मदत करणार आहे. हे वर्कर्स फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत काम करणारे असतील.
एका अहवालानुसार सलमान खान आणि त्याचे फाउंडेशन बींग ह्यूमन सिनेसृष्टीशी निगडीत काम करणाऱ्या कामगारांच्या खात्यात काही पैसे ट्रान्सफर करणार आहेत. त्यासाठी सलमान खान FWICE ची मदत घेणार आहे. FWICE म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन सिने एम्प्लॉईज.
ज्या व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्ष करावा लागतो अशा व्यक्तींना ही फेडरेशन मदत करते. FWICE चे प्रेसिडेंट बी. एन. तिवारी यांनी सांगितले की, सलमान खान हा एक महिना असा अभिनेता आहे ज्यांनी आम्हाला सिनेसृष्टीतील ज्यांचे कोरोना व्हायरस मुळे शूटिंग चे काम थांबले आहे व जे महिना लगबग १५००० रुपये कमावतात अशा कामगारांना मदत करण्यास प्रोत्साहित केले.
सलमानने या आधी या कामगारांच्या आरोग्याच्या सुविधांसाठी पाच लाख रुपयांची मदत केलेली आहे. शिवाय त्यांनी असेही सांगितले की गेल्या दोन वर्षात सलमान खाननी कामगारांना आर्थिक किंवा आरोग्याशी निगडित कारणांसाठी १.५ करोड रुपये रोकड पैशांची मदत केलेली आहे.
सलमान खानचे वडील बॉलिवुडचे दिग्दर्शक असलेल्या सलीम खान ने सांगितले की, आमचा संपूर्ण परिवार कायम अशा लोकांच्या मदतीसाठी तसेच त्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयीसाठी नेहमीच तत्पर असेल. शिवाय त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची काळजी आम्ही घेऊ.
याआधीही अनेक निर्माते दिग्दर्शक तसेच कलाकारांनी अनेक मदतीचे हात पुढे केले आहे. या सर्वांनी मिळून एक नवी संघटना उभी केली आहे तिचे नाव I stand with humanity असे आहे. यामध्ये बॉलिवुड चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, तापसी पन्नू, आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर, दिया मिर्झा, संजय दत्त, आणि नितेश तिवारी आहेत. या संघटने मार्फत कामगारांना १० दिवसांच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल.