मस्तानी झाली शाहरुख खानची शेजारी, शाहरुख शेजारी घर घेण्यासाठी दिले तब्बल एवढे कोटी, वाचून अवाक व्हाल !

284

अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण यांनी नवीन घर खरेदी केले आहे. हे क्वाड्रप्लेक्स वांद्रे येथे असून सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या घराच्या अगदी जवळ आहे. या अपार्टमेंटची किंमत 119 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. सध्या त्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांचे अपार्टमेंट हे समुद्रा समोरच असल्यामुळे तेथून समुद्राचे सुंदर दृश्यही दिसते.

रणवीरने खरेदी केलेल्या अपार्टमेंटचा सौदा हा देशातील सर्वात महागड्या सौद्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. टॉवरच्या 16व्या, 17व्या, 18व्या आणि 19व्या मजल्यावर त्याचे अपार्टमेंट आहे. या सौद्यासोबतच रणवीरला 19 पार्किंगच्या जागा देखील मिळाल्या आहेत. त्या भागात प्रति चौरस फूटाचा दर एक लाख रुपये आहे. रणवीरने 11,266 चौरस फूट कार्पेट क्षेत्रासह 1,300 चौरस फूट टेरेस देखील खरेदी केले आहे.

रणवीरने हे घर ओह फाइव्ह मीडिया वर्क्स एलएलपीच्या माध्यमातून विकत घेतले आहे, त्याचे रणवीर आणि त्याचे वडील जुगजीत सुंदर सिंग भवनानी हे संचालक आहेत. या घरासाठी रणवीरने महसूल विभागाला 7.13 कोटी रुपये मुद्रांक शुल्क दिला.

सागर रेशम रेसिडेन्शिअल टॉवरचे हे आलिशान अपार्टमेंट शाहरुख खानच्या मन्नत आणि सलमानच्या गॅलेक्सीच्या अगदी जवळ असल्यामुळे दीपिका-रणवीर आता या दोन सुपरस्टार्सचे शेजारी होणार आहेत.

रणवीरच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तो आलिया भट्टसोबत करण जोहरच्या रॉकी और रानीमध्ये दिसेल. तसेच राहित शेट्टीच्या सर्कसमध्ये सुद्धा दिसेल. याशिवाय तो लवकरच बेअर ग्रिल्ससोबतचा मॅन व्हर्सेस वाइल्डच्या एका भागात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तो आलिया सोबत कॉफी विथ करण ७ च्या पहिल्या भागात पाहूणा म्हणून आलेला तेव्हाच्या त्याच्या काही स्पष्ट विधानांमुळे तो चर्चेत आहे.

रणवीर लवकरच आपल्याला करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो रोहित शेट्टीच्या सर्कसमध्ये सुद्धा काम करणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !