दीपिका पादुकोण काय म्हणाली तिच्या लग्नाआधीच्या प्रेमाबद्दल !

1038

दीपिका पादुकोण ही आताच्या घडीला हिंदी चित्रपट सृष्टी मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे. भारतात चित्रपटांसाठी सर्वात जास्त मानधन स्वीकारणारी अभिनेत्री ठरली आहे. २०१८ साली दीपिकाने रणवीर सिंह सोबत लग्न केले. ते दोघेही सध्या एक सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. जसं की आपल्याला माहीतच असेल, दीपिका लग्नापूर्वी रणबीर कपूरला डेट करत होती. त्यावेळेस प्रेमात मिळालेल्या धोक्याबद्दल एका मुलाखतीमध्ये बोलली, पण त्यावेळेस ती कोणाचं ही नाव न घेता बोलत होती.
दीपिका बहुतेकदा आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल मोकळेपणाने बोलते. त्या मुलाखतीमध्ये बोलताना ती म्हणाली, ‘माझ्यासाठी सेक्स म्हणजे फक्त शारीरिक जवळीक नव्हे तर आपल्या भावना देखील जोडलेल्या असतात. मी कधी कोणाला फसवलं नाही पण मलाच समोरून धोका दिला गेला तर मी कशी अशा नात्यात राहीन. त्यापेक्षा मी एकटं राहणं पसंद करीन. परंतु सगळेच माझ्यासारखा विचार नाही करत त्यामुळे सुरुवातीला मला खूप दुःख झेलावे लागले. समोरून मला पहिला धोका मिळाला आणि मग तो माफी मागू लागला. तेव्हा मी त्याला माफसुद्धा केले. मला हा विचार करून वाईट वाटतं की मी त्या व्यक्तीला दुसरी संधी का दिली?’
दीपिका म्हणाली, ‘मला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी निश्चितचं खूप वेळ लागला आणि आता मी या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडली आहे तरं कोणीही कितीही काही केलं तरी त्या गोष्टींकडे पुन्हा मला कोणी नेऊ शकत नाही. जेव्हा मला पहिला धोका मिळाला तेव्हा मला असं वाटलं की, माझ्यामध्ये किंवा या नात्यामध्ये काही कमीपणा असावा. पण धोका देणं जेव्हा एखाद्याची सवय होऊन जाते, तेव्हा ती व्यक्ती तेच करू शकते.’
मी आमच्या नात्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या, पण त्याबदल्यात मला काहीच मिळाले नाही. धोका हा कोणत्याही नात्यासाठी पूर्णविराम ठरतो. जेव्हा नात्यामध्ये धोका दिला जातो, खरं लपवलं जातं तेव्हा विश्वास तुटतो, आपल्या नजरेत समोरच्याबद्दलचा आदर कमी होऊन जातो, कारण याचं गोष्टी आपल्या नात्याचा आधार असतात.’