अभिनेता ‘अल्लू अर्जुन’कडे आहे एका अलिशान घराप्रमाणेच लक्झरी व्हॅनिटी व्हॅन, फोटोज पहा ! 

555

तेलगू अभिनेता अल्लू अर्जुन याने त्याच्या चित्रपटातील अभिनया करिता सर्वोत्कृष्ट अभिनय म्हणून फिल्मफेअर आणि नंदी यांसारखे अनेक अवॉर्ड जिंकले आहेत. अर्जुन सेवडील अल्लू अर्जुन तेलुगु चित्रपटातील दिग्दर्शक होते. अल्लू अर्जुन ने २००३ मध्ये लालकृष्ण राघवेंद्र राव यांच्या गंगोत्री या चित्रपटातून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. अल्लू अर्जुन खूप लक्झरी आयुष्य जगतो. त्याच्याजवळ करोडो रुपयांचे अलिशान घर आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे एक शानदार अशी व्हॅनिटी व्हॅन सुद्धा आहे.
अल्लू अर्जुन ने त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो त्याच्या ट्विटर अकाउंट वर शेअर केले होते. त्याची ही व्हॅन खूप लक्झरी आहे. या गाडीची किंमत साधारण सात करोड रुपये इतकी आहे. रेड्डी कस्टम्स द्वारे खासकरून मॉडीफाय केली गेली आहे. या व्हॅन वर अल्लू अर्जुन च्या नावाचा AA असा लोगो सुद्धा लावला आहे. या व्हॅनमधील मास्टर केबिनमध्ये एक रिक्लाइनर आहे ज्याचा वापर अर्जुन मीटिंग साठी व टीव्ही पाहण्यासाठी करतो.
याशिवाय येथे आराम करण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी सुद्धा लक्झरी व्यवस्था केल्या गेल्या आहेत. असे म्हटले जाते की या घ्यायला रेड्डी कस्टम्सने तयार करण्यासाठी पाच महिने लागले होते. यांच्या व्हॅनच्या फक्त इंटिरियर वरच ३.५ करोड रुपये इतका खर्च केला गेला आहे. या व्हॅनिटी व्हॅन चे नाव Folcon असे आहे.
अल्लू अर्जुन त्याच्या घरापेक्षा सुद्धा जास्त वेळ व्हॅनिटी व्हॅन मध्ये घालवतो. या व्हॅनिटी व्हॅन ची तुलना तुम्ही एका अलिशान चालत्या फिरत्या घरासोबत करू शकता. अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ मध्ये झाला. त्याने गंगोत्री या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ६ मार्च २०११ मध्ये त्याने स्नेहा रेड्डी सोबत लग्न केले. आता या दोघांना दोन लहान मुलं आहेत. अल्लु अर्जुनला ५ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !