असे आहे प्रियंका चोपडा आणि निक जोनास चे नवे घर, घर पाहून भारावून जाल !

11197

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा ने अमेरिकन सिंगर सोबत लग्न झाल्यानंतर ती आता अमेरिकेची सून झाली आहे. प्रियंका चोपडा आणि निक जोनास हे दोघे बॉलिवूड आणि हॉलिवूड मधील एक बेस्ट कपल मानले जाते. या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात प्रेक्षकांना सुद्धा ते खूप आवडतात.
नुकतेच प्रियांका आणि निकने अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये एक शानदार घर विकत घेतले आहे. त्या घराला फक्त घर असे म्हणता येणार नाही कारण त्या घराचे फोटो बघितल्यावर तो राजमहाला पेक्षा कमी वाटत नाही. प्रियांका आणि निकचे हे नावे घर ३ एकरा मध्ये पसरले असं ते एका शांत ठिकाणी बांधले आहे. त्यांच्या घराच्या आसपास सुंदर जंगल आहे घरातील खोलीत बसून आरामात समोरील निसर्ग सौंदर्य न्याहाळता येते.
या घरात एक लिविंग रूम आहे त्यामध्ये एक मोठे डायनिंग टेबल आहे ज्यावर संपूर्ण निक आणि प्रियांका चा परिवार आरामात बसून जेवण करू शकतो. प्रियंकाच्या नव्या घरात एकूण सात बेडरूम आणि अकरा बाथरूम आहेत. प्रत्येक खोलीतून बाहेरील विहंगम दृष्य पाहता येते. प्रियांका आणि निकच्या या घरात एक शानदार जिम सुद्धा आहे जेथे ते दोघे आरामात एक्सरसाइज करत असतात.

शिवाय मुव्ही थेटर, वेट बार, गेम रूम, इनडोर बास्केटबॉल कोर्ट, एक बॉलिंग एली, आणि इन्फिनिटी पुल यांसारख्या सुविधा सुद्धा आहेत. शिवाय घरासमोर लॉन आणि तेथे बसण्यासाठी बैठक व्यवस्था सुद्धा आहे. त्यांचे हे अलिशान घर कॅलिफोर्नियामध्ये आहे. आलेल्या माहितीनुसार या घराची किंमत १४२ करोड रुपये इतकी आहे.

हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?

या घरात अजूनही काही अशा गोष्टी आहेत ज्या खूप खास आहेत. प्रियांका आणि निक जर बाहेर कुठे ड्राइव्ह वर गेले असल्यास परत आल्यावर ती गाडी अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पार्क करू शकतात. या गाड्यांसाठी अंडरग्राउंड गॅरेज ची सुविधा सुद्धा आहे. प्रियांका निक जोनास सोबत १ आणि २ डिसेंबरला लग्न केले होते. १ डिसेंबरला निक आणि प्रियंकाने इसाई रितीरिवाजानुसार लग्न केले. त्यानंतर २ डिसेंबरला हिंदू धर्मानुसार सात फेरे घेऊन लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फंक्शन जोधपूर येथील उमेद भवन पॅलेसमध्ये झाले होते.

हे वाचा – एका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण !

या लग्नासाठी प्रियंका आणि निक च्या घरातील सदस्य उपस्थित होते. त्यानंतर या कपलने लग्नानिमित्त अनेक रिसेप्शन पार्टी दिल्या. त्यातील एका रिसेप्शन मध्ये भारताचे पंतप्रधान मोदी सुद्धा सहभागी झाले होते. या दोघांच्या लग्नाची धामधूम अनेक दिवसांपर्यंत चालू होती. लग्नानंतरच काही दिवसांनी अशा बातम्या ऐकू येऊ लागल्या की प्रियांका लवकरच आई बनणार आहे मात्र प्रियंकाची आई मधु चोपडाने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले.

हे वाचा – अख्या जगाला हसवणाऱ्या अवलिया बद्दल जाणून घ्या, सेलिब्रिटी पण इच्छुक असतात याला भेटायला !

प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटी द स्काय इज पिंक या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटांमध्ये प्रियंका सोबत फरहान ने काम केले होते. लवकरच प्रियंका बॉलीवूड मध्ये अजून एका चित्रपटांमध्ये दिसणार असल्याची खबर आहे. सध्यातरी प्रियंका तिच्या पतीसोबत अमेरिकेमध्ये वेळ घालवत आहे.‌

हे वाचा – देशातील सर्वात सुंदर महिला साध्वी, जिचे सौदर्य पाहून तुम्ही हरवून जाल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !