बॉलीवुडचे हे सितारे अशाप्रकारे होळी, रंगपंचमी साजरी करतात !

466

होळीचा हंगाम आल्यावर तर सर्वत्र जाणवू लागतो. आजूबाजूचा परिसर रंगीबिरंगी दिसू लागतो. प्रत्येक जण या रंगीबिरंगी सणाचा उत्साह काही दिवसा आधीपासूनच उपभोगू लागतो. बॉलिवूड आणि होळी याचे किती अतूट नाते आहे हे सर्वांनाच माहिती आहे. बॉलिवूडमधील प्रत्येक जण आपापल्या परीने होळी खेळत असतो. परंतु यावेळी सर्वत्र कोरोनाची भीती पसरल्यामुळे बॉलिवूडची होळी थोडी फिकी पडलेली दिसते. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड सितारे कशाप्रकारे होळी खेळणे पसंत करतात याबाबत माहिती देणार आहोत.

१) प्रियंका चोपडा – प्रियंकाला होळीची इतकी आवड आहे की ती पती निक जोनस सोबत न्यूयॉर्कहून मुंबईला होळी खेळण्यास आली. आणि होळीच्या रंगांमध्ये दोघेही न्हावून निघाले. या दोघांचे होळी खेळण्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेले दिसतात.
२) अनुष्का शर्मा – काही दिवसांपासून चित्रपटसृष्टी पासून लांब असलेली अनुष्का शर्मा होळीसाठी खूप उत्साही दिसते. तिच्यासाठी तिच्या चित्रपटांप्रमाणेच होळी हा सण देखील एक उत्साह घेऊन येतो. अनुष्काचे असे म्हणणे आहे की तिला होळी खेळायला खूप मजा वाटते परंतु होळी खेळून झाल्यावर अंगावरील रंग घालवणे ही एक मोठी सजा असते. त्यामुळे ती संपूर्ण तयारीनिशी होळी खेळते. तिच्यासाठी तिने दिल्लीमध्ये खेळलेली प्रत्येक होईल ही खास आहे.
३) आलिया भट – बॉलिवूडची बबली गल आलिया ने सांगितले कि ती होळी खूप मस्त आणि बिनधास्तपणे खेळते. तिला कलर्स ची एलर्जी आहे म्हणून ती गडद आणि पक्क्या रंगांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. परंतु तिच्या खास मित्र परिवारा सोबत होळीचा आनंद लुटणे तिला नेहमीच आवडते.
४) अक्षय कुमार – खिलाडी अक्षय कुमार ला सुद्धा होळीचा सण खूप आवडतो. अक्षय कुमारचा असे म्हणणे आहे की होळी हा सण म्हणजे एकता आणि प्रेमाचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे भेटण्याचा आणि भेटी घेण्याचा हा एक बहाणा असतो. होळीचा सण अक्षय कुमार खूप धामधूमीने त्याच्या मित्र परिवारासोबत साजरा करतो.
५) वरुण धवन – वरूण धवन होळीसाठी नेहमीच उत्साही असतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरुण धवन यावर्षी होळी त्याची गर्लफ्रेंड नताशा आणि परिवारासोबत साजरी करणार आहे.
६) आर. माधवन – तसे बघायला गेले तर आर माधवन साउथ इंडियन आहे. परंतु त्यांचे शिक्षण बिहारमध्ये झाल्यामुळे युपी बिहार ची होळी व त्या वेळी केली जाणारी मस्ती त्यांना चांगलीच ठाऊक आहे. तेवीस सगळ्यांना सांगतात की होळी खेळायची असेल तर बिहारी स्टाईल नी खेळा तरच खरी होळीची मजा कळेल. आर माधवन यांना होळीची कन्सेप्ट खूपच आवडते परंतू टाइट शेड्युलमुळे ते पहिल्यासारखी होळी खेळू शकत नाही.
७) सौम्या सेट – सोम्या मूळची बनारस ची आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ते कलरफुल होळी खेळत आणि बघत मोठी झाली आहे. सध्या ते मुंबई त्याच्या परिवारासोबत ड्राय होळी खेळेल. यामागचे कारण म्हणजे महाराष्ट्रात सध्या पाण्याची कमी खूप भासत असल्यामुळे ती सुखी होळी खेळणे पसंत करणार असे सांगितले. यामुळे पाण्याचे बचत सुद्धा होणार आणि होळीचा आनंद सुद्धा लुटता येईल.
८) करण सिंह ग्रोवर – करणला होळीचा सण खूप आवडतो. होळीच्या दिवशी तो गुलालाने होळी खेळणे पसंद करतो. या काही वर्षांपासून चित्याची होळी काही कारणांमुळे खास आहे ते म्हणजे ही काही वर्षे त्याच्यासोबत त्याची लेडी लव बिपाशा बासू त्याच्या सोबत असते. त्यामुळे तोसुद्धा होळीचा आनंद भाषा सोबत लुटणे पसंत करतो.
९) पूजा गौड – प्रतिज्ञा सीरियल मधून प्रसिद्ध आलेली पूजा होळीचा सण साजरा करणे खूप पसंत करते. तिथे असे म्हणणे आहे की हा सण म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय असतो.‌ ती होळीचा सण आणि को-स्टार सोबत साजरा करते.
१०) शंकर महादेवन – शंकर महादेव त्यांच्या होळीच्या आठवणी ताज्या करताना सांगतात की त्यांनी लहानपणी चिखलाची होळी खेळली होती. त्यांचे असे म्हणणे आहे की होळी खेळण्याचा सगळ्यात सोपा, स्वस्त आणि उत्तम प्रकार म्हणजे चिखला सोबत होळी खेळणे.
११) अनुपम खेर – अनुपम खेर यांच्यामध्ये होळी चा अर्थ खुशी, मस्ती आणि सुंदर रंगांनी एकमेकांमध्ये प्रेम वाटणे. ते नेहमी या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. त्यांचे असे म्हणणे आहे की हा एकमेव असा सण आहे ज्यात रंग त्यांच्यासोबत खेळण्यास प्रत्येक व्यक्तीस आकर्षित करत असतात. अनुपम खेर सध्या त्यांचा पुढील येणारा चित्रपट नाम शबानाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते यावर्षीची होळी सुध्दा त्यांच्या चित्रपटाच्या टीम सोबतच साजरी करणार आहे.
१२) मधूर भांडारकर – मधुर भांडारकर यांचे असे म्हणणे आहे की होळीच्या दिवसात सगळ्यांच्या घरी जीवनातील अनेक रंग येतात जे आयुष्यातील सुंदरतेला बांधून ठेवतात. हा एक असा सण आहे जो परिवाराला एकत्र आणतो आणि एकमेकांमध्ये प्रेम वाटण्याची संधी देतो.
१३) यामी गौतम – यामी असे सांगते की तिला होळी खेळणे खूप आवडते. होळी हा असा सण असतो जो आपल्या बालपणाच्या खूप जवळ असतो. जेव्हा ती छोटी होती तेव्हा तिच्या भावा बहिणी सोबत मिळून खूप मस्ती करायची. त्यावेळी होळीचे रंग सुद्धा खूप वेगळे असायचे.
१४) विवेक ओबेरॉय – विवेकच्या मध्ये होळी हा खूप उत्साहपूर्ण सण आहे. प्रत्येक रंग हा आपल्याला हसणे, रडणे आणि जीवनातील अनेक रूपांची ओळख करून देतो. विवेक नेहमीच सुक्या रंगानी होळी खेळण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे अनेक शहरे आणि गावे अशी आहेत जिथे पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पाण्याचा वापर कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशावेळी पाण्याने होळी खेळणे हे गुन्ह्यापेक्षा कमी नसते.
१५) दीपिका पदुकोण – दीपिकाला लहानपणापासूनच होळी हा सण खूप आवडतो. दीपिकाच्या लहानपणी संपूर्ण मित्रपरिवार होळीच्या आधी एक आठवडा होळीची तयारी करण्यास सुरू व्हायचे. लहानपणी दिपीका तिच्या बिल्डींग मध्ये होळी खेळायची.१६) नर्गीस फाखरी – नर्गिसचे असे म्हणणे आहे की ते लहानपणी होळी कधीच खेळली नाही. २०११ मध्ये जेव्हा नर्गिस जेव्हा भारतात आली तेव्हा पहिल्यांदाच होळीचा सण साजरा केला. होळीचा सण हा खरंच खूप मजेदार आहे परंतु होळी खेळल्यानंतर ते रंग काढण्यास खूपच वेळ जातो.
१७) आयुष्मान खुराना – आयुष्मान खुराना मूळचा उत्तर भारतातील असून सुद्धा त्याला होळी खेळणे आवडत नाही. आयुष्मान ला साफसूत्रे राहणे खूप आवडते त्यामुळे रंगांसोबत खेळणे हे त्याच्यासाठी असंभव असल्याचे तो सांगतो. होळी व्यतिरिक्त सामान्य वेळ सुद्धा तो एका तासात चार-पाच वेळा तरी हात धुतो तर मग विचार करा आयुष्मान होळी खेळला तर काय होईल.