बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या नंतर या स्पर्धकांचे चमकले नशीब !

311

हिंदी कलर्स वाहिनीवरील सुप्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉस सीजन १३ विजेता नुकताच घोषित झाला. बिग बॉसच्या या सीजन मधील विजेता ठरला सिद्धार्थ शुक्ला आणि फर्स्ट रनर अप आसीम रियाज झाला. यावर्षी विजेतेपद जरी सिद्धार्थ शुक्ला ने पटकावले असले तरी प्रेक्षकांची मन जिंकण्यात आसीम रियाज देखील मागे राहिलेला नाही. आसीम बिग बॉसच्या घरात ज्या प्रकारे स्वतःला प्रदर्शित करून खेळ खेळला त्यामुळेच तो प्रेक्षकांचा लाडका सुद्धा झाला होता. फास्ट अँड फ्युरियस पासून ते जॉन सिन्हा पर्यंत दिग्गजांनी ट्विटरवर ट्विट करून आसीमला समर्थन दिले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडून आसीमचे नशीब नक्कीच चमकले आहे.
बिग बॉसच्या घरातील माहिती देणाऱ्या मिस्टर खबरीच्या मते आसीम रियाजला एका चित्रपटाची ऑफर आलेली आहे. आणि या चित्रपटात त्याच्या अपोझिट दुसरी तिसरी कोण नाही तर बॉलीवूडच्या किंगची म्हणजेच शाहरूख खानची लेक सुहाना खान दिसणार आहे. हा चित्रपट आसीम व सुहाना साठी बॉलीवूड पदार्पणाचा पहिला चित्रपट ठरेल. हा चित्रपट म्हणजे करण जोहरच्या फ्रॅंचाईजी असलेल्या स्टुडन्ट ऑफ द इयर या सिरीजचा चौथा पार्ट असेल.
या चित्रपटाबद्दल अजून पर्यंत कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु ही खबर जर खरी असेल तर आसीम आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच एक खूषखबर ठरेल. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी आसीमला मोजकेच लोक ओळखायचे. परंतु बिग बॉस या रियालिटी शोमुळे आसीमचा चाहता वर्ग खूप मोठा झाला आहे. या शोमध्ये आसीम वर बायस्ड असल्याचा आरोप लावला होता परंतु या शो नंतर झालेल्या एका मुलाखतीत आसीम ने सांगितले की हे साफ चुकीचे आहे. मी बायस्ड आहे असे मुळीच नाही. लोकांच्या प्रेमामुळेच मी आणि सिद्धार्थ आज इथपर्यंत येऊ शकलो. इथे जे समोर दिसते तेच खरे आहे.