सलमान खान विरुद्ध या अभिनेत्याने पोलीस ठाण्यात केली तक्रार, हे आहे कारण !

45598

सुपरस्टार सलमान खानच्या ट्विट शी संबंधित एक प्रकरण समोर आले आहे. अभिनेता अंश अरोरा ने सलमान खान विरोधात, धोका दिल्याची तक्रार नोंदवली आहे. अंश अरोरा ला सलमान खानच्या चित्रपटात कास्टिंगसाठी अनेक मेल्स आणि फोन आले होते.
एका वृत्त एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, अंश अरोराने असा दावा केला आहे की, एका श्रुती नावाच्या मुलीने त्याच्याशी या चित्रपटाबद्दल बोलले होते. तिने सांगितले की सलमान खानचा पुढील चित्रपट टायगर जिंदा है ३ या चित्रपटात अंश ला निगेटिव्ह रोल ऑफर केला आहे. त्यासोबतच अंश ला सलमान खान फिल्मस या फेक आयडी वरून मेल सुद्धा आले होते. या मेलमध्ये अंशाच्या ऑडिशन सोबतच दिग्दर्शक प्रभू देवा सोबत मिटिंग बद्दल लिहिले होते.
अंश ने सांगितले श्रुती नावाची व्यक्ती स्वतःला सलमान खान फिल्मसची प्रतिनिधी आहे म्हणून सांगत होती. तिने अंशला सांगितले सलमान खानचा पुढील चित्रपट टायगर जिंदा है ३ ची कास्टिंग सुरू आहे. या चित्रपटातील निगेटिव्ह भूमिकेसाठी आम्ही तुमची ऑडिशन घेऊ इच्छितो. सोबत त्याला साकारायचा पात्राबद्दल आणि गोष्टीबद्दल सुद्धा सांगितले. सलमान आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभू देवा सोबत ३ मार्चला मीटिंग सुद्धा फिक्स केली होती.
मात्र नंतर प्रभुदेवा बिझी असल्याचे कारण देत ही मिटिंग रदू केली गेली. याशिवाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे अंश ला सांगितले गेले की त्याचे फोटो आणि व्हिडिओ बघून त्याचे सिलेक्शन झाले आहे. पण नंतर सलमान खान फिल्मस अधिकृत रित्या असे सांगितले की आम्ही कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग करत नाही आहोत. त्यावेळी अंश ला समजले की त्याच्यासोबत धोका केला गेला आहे. या धोक्यामुळे अंश च्या पुढील वेळापत्रकावर सुद्धा परिणाम झाला होता.
सलमान खान फिल्मसच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून एक नोटीस प्रसिद्ध केली गेली होती त्यामध्ये लिहिले होते की- सलमान खान किंवा त्याची कंपनी सध्या कोणत्या चित्रपटाचे कास्टिंग करत नाही आहे. तसेच आम्ही आमच्या येणाऱ्या कोणत्याच चित्रपटासाठी कास्टिंग कंपनी तयार केलेली नाही. त्यामुळे या संबंधित मिळणाऱ्या कोणत्याही संदेश किंवा ई-मेलवर विश्वास ठेवू नका. जर कोणी सलमान खान किंवा सलमान खान फिल्मस चे अधिकृत नाव वापरून लोकांना फसवण्याचे काम करत असल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !