मिस्टर परफेक्ट ‘अमीर खान’ काय करतोय या लुक मध्ये, जाणून घ्या !

2103

हिंदी चित्रपट सृष्टीत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ असं ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे आमिर खान. त्यांचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्साही आहेत. या चित्रपटातील आमिर खानच्या पात्राबद्दल चर्चा सुरु झाली आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटात आमिर खान वेगवेगळ्या पेहरावामध्ये दिसणार आहे. तर आमिर खान यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या सेटवर आमिर यांचा चाहत्याबरोबर फोटो सोशल मीडियावर फार फिरतो आहे. या फोटोमध्ये आमिर हे पूर्ण दाढीमध्ये दिसत आहेत. फोटोमध्ये त्यांनी एक गणवेश घातला आहे. याआधी लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या सेटवरुन आमिर यांचा लांब केसांचा फोटो देखील समोर आला होता. त्या फोटोमधील पेहरावावरून त्या चित्रपटाची जोरदार चर्चा घोंघावू लागली. आता सध्या गणवेश घातलेल्या फोटोमधील पेहराव एक नवी गोष्ट सांगून जातं आहे.
आमिर खान यांचा प्रत्येक चित्रपट हा काहीतरी वेगळं, नवीन, माहितीपूर्ण सांगून जातं असतो. लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या माध्यमातून असचं काहीतरी वेगळं आणि हटके करू पाहत आहेत आणि या चित्रपटाचा पोस्टर बघून आपण याचा अंदाज बांधू शकतो. या पोस्टरमध्ये आमिर खान सरदारजींचा पेहरावामध्ये आणि सोबतच लाल पगडी बांधून रेल्वेच्या सीटवर बसलेले आहेत. आमिर खान यांच्या या पेहरावातील फोटोला बऱ्याच लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या चित्रपटाचा अजून टीझर देखील आलेला नसून देखील अतिशय प्रतिक्षीत असा हा चित्रपट असल्याचे दिसून येते.

लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झालेल्या हॉलीवुड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ (Forrest Gump)चा हिंदी रिमेक आहे. अद्वैत चंदन या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर आमिर खान यांच्यासोबत मुख्य पात्र म्हणून करीना कपूर खान देखील या चित्रपटामध्ये आहे.