अक्षय कुमारच्या बहिणीने या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे अक्षय कुमार झाला होता नाराज !

849

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार सध्या या दिवसात त्याच्या पत्नीसोबत लॉक डाऊन मुळे घरी वेळ घालवत आहे. अक्षय ने फक्त ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये कामच केले नाही तर या लॉक डाऊनच्या काळात लोकांना घरी सुरक्षित राहण्यासाठी तो जागृत सुद्धा करत आहे. नुकतेच अक्षयने बॉलिवूडमधील इतर कलाकारांसोबत मिळून एक गाणी तयार केलेले ज्याचे बोल मुस्कुरायेगा इंडिया असे होते.
लोकांना सर्व कलाकारांनी मिळून बनवलेले हे गाणे खूप पसंत पडले. सध्या कोरोनाव्हायरस च्या संक्रमणामुळे सर्व चित्रपटांच्या शूटिंग थांबल्या आहेत. त्यामुळे या काळात वेगवेगळ्या कलाकारांशी संबंधित बातम्या समोर येत असतात. आज आम्ही तुम्हाला अक्षय कुमारच्या बहिणी बद्दल सांगणार आहोत जिच्या एका निर्णयामुळे अक्षय कुमार खूप नाराज झाला होता.
अक्षय कुमार हा एक चित्रपट अभिनेत्यासोबतच एक फॅमिली मॅन सुद्धा आहे. अक्षय कुमारला एक छोटी बहिण आहे हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. अक्षय च्या छोट्या बहिणीचे नाव अलका असून ती लाईमलाईट असून दूर राहणे पसंत करते. अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांच्या गराड्यात प्रसिद्ध असतो तर त्याची बहीण मीडियापासून दूर राहते.
मात्र २०१२ मध्ये आहे एकदा चर्चेत आली होती. तिच्या चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे तिचे लग्न. तिच्या लग्नाबद्दल विशेष बाब म्हणजे तिच्या लग्नामुळे अक्षय कुमार सुरुवातीला खूप नाराज होता. अलकाने ज्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला ती व्यक्ती अलकाहून वयाने पंधरा वर्षे मोठी होती.
अलकाने २०१२ मध्ये तिच्याहून पंधरा वर्षे मोठे असलेल्या बिझनेस मॅन सुरेंद्र हिरानंदानी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे प्रेम विवाह होते. सुरेंद्र यांचे हे दुसरे लग्न होते. कन्स्ट्रक्शन कंपनी हिरानंदानी ग्रुपचे सुरेंद्र हे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

हे वाचा – सलमान खानला किस करू इच्छिते ही अभिनेत्री, तसेच बोलून दाखवल्या मनातल्या इच्छा !

त्यावेळी सुरेंद्र आणि अलकाच्या लग्नामुळे अक्षय कुमार खूप नाराज होता. याचे मुख्य कारण म्हणजे एक तर सुरेंद्र हे अलकाहून १५ वर्षांनी मोठे होते शिवाय हे त्यांचे दुसरे लग्न होते. दुसरे लग्न करण्याआधी सुरेंद्र यांनी त्यांची पहिली पत्नी प्रीतीला २०११ मध्ये वेगळे झाले. त्यानंतर ते अलकाच्या प्रेमात पडले. २०१२ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा – अशी होती रोहित शर्माआणि रितिका सजदेहयांची लव स्टोरी, युवराज सिंगने केली मध्यस्थी !

अलकाने खूप समजावल्यानंतर अक्षय कुमारला तिचे म्हणणे मानावे लागले त्यानंतर तो या लग्नास तयार झाला. या लग्नावेळी अक्षयने स्वतःहून पुढाकार सर्व देखरेख केली आणि अक्षयच्या परिवाराने संपूर्ण धामधुमीत अलका चे लग्न लावून दिले. लग्नानंतर अलका आणि सुरेंद्र हनीमून साठी टर्की ला गेले होते. सध्या अलका ही एक हाउस वाईफ असून तिचे घर सांभाळते. काही काळापूर्वी तिने फुगली हा चित्रपट प्रोड्युस सुद्धा केला होता.

हे वाचा – ४ वर्षानंतर अशी दिसते बजरंगी भाईजान मधील मुन्नीतिला पाहून चकित व्हाल !
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जाऊ शकतो. या चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकांचे असे म्हणणे आहे की लॉक डाऊन संपल्यावर प्रेक्षक लगेचच सिनेमागृहात चित्रपट पाहण्यास जाणार नाहीत त्यामुळे हा चित्रपट सिनेमागृहा ऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची तयारी झाली असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. या चित्रपटा व्यतिरिक्त अक्षय कुमार डेव्हीड धवनच्या एका कॉमेडी चित्रपटांमध्ये सुद्धा दिसणार आहे.

हे वाचा – सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणारी रिक्षा, बसू शकतात ५ लोकं, महिंद्रा कंपनीकडून झाला जॉब ऑफर !

हे वाचा – कधी एकेकाळी वडिलांनी धूडकावून लावली होती सलमान बरोबर लग्नाची ऑफर, आता लॉक डाउनमध्ये घरात बसून करत आहे हे काम !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !