अक्षय कुमार फक्त करोडो रुपयांचा मालक नाही तर या दुनियेतल्या ५ महागड्या गोष्टी पण आहेत त्याच्याकडे !

314

बॉलिवुडची खिलाडी म्हणुन ओळख असलेल्या अक्षय कुमारची बॉलिवुडमधील सुरुवात दिदार या चित्रपटातुन झाली होती. त्यानंतर त्याने आणखी काही चित्रपट केले मात्र त्यांत हवेतसे यश मिळाले नाही. पण जेव्हा त्याने खिलाडी चित्रपट केला तेव्हा त्याला सर्वत्र खिलाडी अशी ओळख मिळाली. अजनबी चित्रपटातील खलनायकाच्या पात्रासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला.

अनेक संघर्षमय टप्पे पार करत अक्षय इथपर्यंत पोहचला आहे. हे सर्व मिळवण्यासाठी त्याला अनेक वर्षांचा कालावधी लागला.त्याचे नाव बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत घेतले जाऊ लागले. अक्षयला रॉयल आणि लग्झरी आयुष्य जगायला खुप आवडते. आज आम्ही तुम्हाला अक्षयच्या ५ महागड्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

मुंबईत सी फेस डुप्लेक्स – ट्विंकल खन्नाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा त्याच्या समुद्र किनारी असलेल्या घराची झलक पाहण्यास मिळालेली.या घरात लिविंग रूम, एक गार्डन, होम थिएटर, किचन, डाइनिंग एरिया आणि वॉक-इन कोठरी आहे.

२०१७ मध्ये अक्षयने अंधेरी येथील लिंक रोडला असलेल्या ३८ मजल्याच्या ट्रांसकॉन ट्रायम्फ इमारतीच्या २१ व्या मजल्यावर २,२०० स्केअर फुटाचे ४ फ्लॅट खरेदी केले. त्या प्रत्येक फ्लॅटची किंमत करोडोच्या घरात आहे.

एक रोल्स-रॉयस फैंटम VII – अक्षय कुमार फॅंटमच्या सातव्या जनरेशनचा मालक आहे. त्यात एक 460 बीएचपी 6.75-लीटर ट्विन-टर्बो V12 इंजिन आहे. रोल्स-रॉयस फैंटम ची आठवी जनरेशन ही भारतात विकली जाणारी सर्वात महागडी गाडी आहे.त्याची बेस मॉडेल किंमतच ही तब्बल ९.५ करोड रुपये आहे.

गोव्याला हॉलिडे होम – अक्षयचा गोव्याला पोर्तुगल स्टाईल एक विला आहे. समुद्र किनारी असलेल्या या व्हील्यात एक स्विमिंग पुलसुद्धा आहे.

एक मर्सिडीज-बेंज 5-क्लास – देशात शानदार आणि आरामदायक मानल्या जाणाऱ्या मर्सिडीज-बेंज 5-क्लास गाडीचा मालक आहे. या गाडीची किंमत १.१६ करोड रुपये आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !