अक्षय कुमारने पुन्हा एकदा पुढे केला मदतीचा हात, जाणून घ्या कशी केली त्याने मदत !

762

बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रतिभाशाली आणि सर्वात लोकप्रिय सुपरस्टार बद्दल बोलायचे झाल्यास निश्चितच अक्षय कुमार चे नाव टॉप वर येते. अक्षय कुमार आज ज्या स्थानावर आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले होते. चांदणी चौक येथील गल्ल्यांमधून या सुपरस्टार ने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. आपली मेहनत प्रतिभा आणि मोठ्या संघर्षाच्या दमावर अक्षय कुमार आज त्यांच्या करिअरच्या उंच शिखरावर तटस्थ उभा आहे. त्याच्या आयुष्याची ही सफर इतर नागरिकांसाठी सुद्धा प्रेरणादायक ठरू शकते.
अक्षय कुमारचे स्टारडम त्याच्या फॅन्सच्या मनात खूप चांगले बसले आहे. अक्षय कुमारच्या प्रतीचे प्रेम प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नेहमीच उजळून दिसते. सोबतच अक्षय कुमार चे नाव बॉलीवुडच्या त्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते जे कधीही मदत करण्यास तत्पर असतात. मग ते पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवारांना मदत करणे असो किंवा ओडिशामध्ये आलेल्या फोनी वादळात सापडलेल्या परिवारांची मदत करणे असो या सर्व कार्यात अक्षयने नेहमीच मोठे मन दाखवून करोडो रुपयांची मदत केलेली आहे. कदाचित हे सुद्धा कारण असू शकते की ज्यामुळे अक्षयकुमार त्याच्या फॅन्सच्या मनावर राज्य करतो.
सध्या कोरोनाव्हायरस मुळे संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे. अशा या संकटाच्या काळात अक्षय कुमारने पीएम केअर्स फंड मध्ये २५ करोड रुपये दान केले. यानंतर सुद्धा तो स्वतः लोकांची मदत करत राहिला. अशातच पुन्हा एकदा अक्षय कुमारने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला ४५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारची ही मदत CINTA शी निगडीत ज्युनियर कलाकारांसाठी आहे. याव्यतिरिक्त अक्षयने पीपीई किट आणि मास्क गरिबांना वाटले आहेत. याबाबत स्पष्टीकरण स्वतः CINTA सीनियर जॉईंट सेक्रेटरी आणि अभिनेता अमित बहल यांनी केले.
अमित यांनी सांगितले की अयुब खान तर्फे ही योजना राबवली गेली. अयुब कमिटी चे सदस्य आहेत. या लॉक डाऊनच्या काळात लोकांच्या कशाप्रकारे नोकऱ्या जाऊन पैसे नसल्यामुळे कसे दिवस घालावे लागत आहेत हे अयूबने जावेद जाफरी यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर जावेद जाफरी यांनी ही गोष्ट साजिद नाडियावाला यांना सांगितली आणि साजिदने अक्षय कुमार ला सांगितली. यानंतर अक्षयने अशा कामगारांची लिस्ट मागून घेतली आणि त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. अक्षय कडे साधारण १५०० लोकांची लिस्ट होती. त्याने प्रत्येकाच्या खात्यामध्ये ३००० रुपये ट्रान्सफर केले. म्हणजेच १५०० कामगारांना प्रति ३००० म्हणजेच अक्षयने एकूण ४५ लाख रुपयांची मदत केली. सोबतच अमितने हे सुद्धा सांगितले की अक्षय आणि साजिदने यापुढे असे काही संकट उद्भवल्यास ते स्वतःहून मदत करतील असा निर्णय घेतला आहे.
अक्षय कुमार सुरुवातीपासूनच गरीब आणि फिल्म इंडस्ट्रीशी निगडित लोकांना मदत करत आला आहे. आणि यापुढे गरज पडल्यास तो मदत करत राहील असे देखील त्याने सांगितले. जेव्हा अक्षयने २५ करोड रुपये पीएम मध्ये डोनेट केले होते तेव्हा त्याने सांगितले की, सध्या हा असा काळ आहे जेथे माणसाच्या जीवाची किंमत इतर कोणत्याही गोष्टीहून अधिक आहे. त्यामुळे सध्या आपण जमेल तितक्या सर्व गोष्टी मदतीसाठी करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा कठीण काळात मी माझ्या सेविंग मधून २५ करोड रुपयांची मदत करत आहे कारण जान है तो जहाँ है!