आमिर खान सोबत काम करणारी अभिनेत्री सध्या चित्रपट श्रुष्टी सोडून करते हे काम !

2158

एकदा का लाईमलाईटमध्ये आल्यावर त्या लाईमलाईट पासून दूर जाणे कोणालाही आवडत नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे चित्रपटांपासून दूर राहून देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. अक्षय कुमार आणि अमीर खान सोबत काम करणारी अशी अभिनेत्री आहे जी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अचानक फिल्मी दुनिया पासून गायब झाली. आम्ही बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा जुल्का. आयेशा जुल्का ही एकेकाळी तरुणांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. मात्र हजारो मनांना तोडत अचानक तिने लग्न केले.
आयेशा जुल्का ने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९८३ मध्ये आलेल्या ‘कैसे कैसे लोग’ या चित्रपटामधून केली होती.‌ या चित्रपटाने तिला स्वतःची ओळख मिळवून दिली. त्यानंतर १९९१ मध्ये आलेल्या एका चित्रपटामुळे ती जास्त प्रसिद्ध झाली कारण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर तिने अनेक एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आणि दिग्दर्शकांची ती पहिली पसंती बनली. १९९२ मध्ये आयेशाला ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटामध्ये आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने तिच्या करिअरला उंच शिखरावर नेउन ठेवले. त्याच वर्षी तिचा खिलाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
आयेशा जुल्काने अक्षय कुमार, अमीर खान, सलमान खान, अजय देवगन, गोविंदा यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिने तिच्या संपूर्ण करिअरमध्ये एकूण ५२ चित्रपट केले. यातील काही चित्रपट सुपरहिट सुद्धा ठरले. आयेशाने बॉलिवूड सोबतच ओडिया, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. साल २००६ पर्यंत सतत काम केल्यानंतर अचानक ती इंडस्ट्री मधून गायब झाली. २००३ मध्ये आयेशाने बिझनेस मॅन समीर वाशी सोबत गपचूप लग्न केले. त्यानंतर काही काळाने फिल्मी दुनियेला सोडून ती तिच्या पतीचा बिजनेस सांभाळण्यात मदत करू लागली.
आजच्या काळात आयेशा करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीची मालकिण आहे. सध्या ती एक मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी सांभाळत असून या कंपनीचे नाव सैमरॉक डेव्हलपर्स असे आहे. ही कंपनी तिने तिचा पती समीर वाशी सोबत मिळून सुरू केली होती. या कंपनी व्यतिरिक्त आहे त्याचा स्वतःचा स्पा बिजनेस सुद्धा आहे. या बिजनेस चे नाव अनंता असे ठेवले आहे. सोबतच तिचा एडिशन या नावाने एक क्लोदींग ब्रँड सुद्धा आहे. बाजारात हा ब्रँड खूप प्रसिद्ध आहे. अभिनयासोबतच आयेशा एक उत्कृष्ट डिझायनर आहे. गोव्यामध्ये तिचे एक बुटीक रिजार्ट आहे.
अनेक हिट चित्रपट देणारी आयेशा जुल्का आता लाईम लाईट पासून दूर राहून एक बिझनेसवुमन आहे. विशेष म्हणजे ती तिच्या सध्याचे आयुष्यात खूप खुश आहे.