Headlines

अभिनेता मोहनलाल यांचे आहे दुबईतील बुर्ज खलिफा मध्ये घर, राहणीमान महाराजा पेक्षा कमी नाही !

मल्याळम चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल यांचा जन्म २१ मे १९६० ला‌ केरळ येथील एलनथूर मध्ये झाला. अभिनेत्यासोबतच ते निर्माता, गायक आणि थिएटर आर्टिस्ट सुद्धा आहेत. मोहनलाल हे नाव मल्याळम चित्रपटांमध्ये खुप मोठे नाव मानले जाते. मोहनलाल यांचे वडील विश्वनाथन नायर हे मोठे वकील होते. मोहनलाल यांचे शिक्षण तिरुवनंतपुरम येथे झाले. बालपणापासूनच त्यांना कला हे क्षेत्र खूप आवडायचे. अनेक नाटकांमध्ये ते भाग घ्यायचे. नुकताच त्यांचा वाढदिवस झाला चला तर मग त्यांच्याशी निगडित काही गोष्टी जाणून घेऊ.
मोहनलाल यांचा पहिला चित्रपट थिरनोत्तम हा १९७८ मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र सेन्सॉर बोर्डच्या आपत्तीमुळे हा चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांना १९८० मध्ये आलेल्या मंजिल विरिन्या पूक्कल या चित्रपटांमधून त्यांना भरपूर यश संपादन झाले. या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली होती. त्यावेळी हा चित्रपट ब्लॉक बस्टर ठरला होता. या चित्रपटापासून त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. ऐंशीच्या दशकात त्यांची लोकप्रियता एवढी वाढत गेली की १९८२ ते १९८६ दरम्यान दर पंधरा दिवसांनी त्यांचे चित्रपट प्रदर्शित व्हायचे. १९८३ मध्ये मोहनलाल यांनी २५ हून अधिक फीचर चित्रपटांमध्ये काम केले.
१९८६ हे वर्षा त्यांच्यासाठी खूप भाग्यदायी ठरले. Rajavinte Makan या चित्रपटात त्यांना डॉनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या संधीचे सोने करून ते प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. वानाप्रस्तम या चित्रपटात मोहन लाल यांनी स्मृती गमावलेल्या एका कथकली नृत्य कलाकाराची भूमिका निभावली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. हा पहिलाच असा चित्रपट होता जो आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा लोकांना पसंत पडला. शिवाय हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवल साठी सुद्धा निवडला गेला तेथे सुद्धा समीक्षकांनी मोहनलाल यांच्या अभिनयाचे फार कौतुक केले.
अभिनयासोबतच मोहनलाल यांना ताइक्वांडो चे खूप वेड आहे. २०१२ मध्ये वर्ल्ड ताइक्वांडो कडून मोहनलाल यांना ब्लॅक बेल्ट ने सन्मानित केले गेले होते. याआधी ते एक प्रोफेशनल रेसलर सुद्धा होते. २००१ मध्ये मोहनलाल यांना भारत सरकारद्वारे पद्मश्री या सन्मानित पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मोहनलाल हे एकमेव असे अभिनेता आहेत ज्यांना नऊ वेळा सर्वश्रेष्ठ अभिनेता या श्रेणीमध्ये राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यातील चार वेळा त्यांनी हा पुरस्कार जिंकला होता. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणजेच अमिताभ बच्चन हे सुद्धा मोहनलाल यांचे मोठे फॅन आहेत.

हे वाचा – शाळेच्या गणवेशात खूप सुंदर दिसत आहे ही अभिनेत्री, एकेकाळी एकाच मालिकेसाठी मिळाले होते १२ पुरस्कार !

मोहनलाल यांचा दुबईतील बुर्ज खलीफा मध्ये एक फ्लॅट आहे. त्यांचे घर बुर्जखलिफा मधील २९ व्या मजल्यावर आहे. त्यांनी हे घर २०११ मध्ये खरेदी केले मोहनलाल यांच्याकडे मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू, जगूआर, आणि रेंज रोवर यांसारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत. फिल्म प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशन सोबतच मोहनलाल यांचा रेस्टॉरंट आणि मसाला पॅकेजिंग चा बिजनेस यांना साऊथ मधील अंबानी म्हणून ओळखले जाते. त्यांचे राहणीमान कोणा राजा-महाराजा पेक्षा कमी नाही विशेष म्हणजे त्यांनी हे सर्व त्यांच्या स्वतःच्या मेहनतीवर उभे केले आहे.‌

हे वाचा – बॉलिवुड मध्ये अभिनेत्री बनण्यासाठी काय परिस्थिती मधून जावे लागले ऐका अभिनेत्रींच्याच तोंडून !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *