लव्ह मॅरेज केले आणि दोन वर्षाने बायकोचे दुसरे लग्न पण लावून दिले, सुहागरात्रीला बायकोने केली अजब मागणी !

264

आजच्या काळात नात टिकवणं फार कठिण काम झाल आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एका पतीने स्वता आपल्या पत्नीचे दुसरे लग्न लावून दिले. एवढेच नाही तर ही सोयरिक त्या मुलीच्या सासूनेच शोधली. या लग्नाला सगळे अगदी आनंदाने सहभागी झाले होते.

त्यानंतर ती महिला आपल्या दुसऱ्या पतीच्या घरी गेली. पण जशी मधूचंद्राची वेळ आली तशी तिने अनोखी अट घातली. तिची ती अट ऐकून नवा नवरदेवही चक्रावला. चला तर जाणूया सविस्तर…

यूपीमधील कन्नौजमध्ये राहणाऱ्या एका महिलेचे दोन वर्षांपूर्वी कन्नौजमध्येच राहणाऱ्या एका मुलाशी लग्न झाले होते. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर दोघांचा सुखाचा संसार सुरु झाला. पण त्यानंतर 2 वर्षांनी त्या महिलेच्या सासरच्यांनी तिचे लग्न गुलाबपुरमध्ये राहणाऱ्या एका मुलाशी ठरवले.

या १० ऑक्टोबरला त्यांचे लग्न झाले. त्या लग्नात महिलेचा पहिला नवरा व सासरकडची मंडळीसुद्धा सहभागी होती. लग्न धुमधडाक्यात पार पडले. त्यानंतर जेव्हा मधूचंद्राची वेळ झाली तेव्हा महिलेने त्याच्याकडे अनोखी मागणी केली. तिची विचित्र मागणी ऐकून नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली.

महिलेने नवरदेवाला सांगितले की मला माझ्या पहिल्या पतीकडे जायचे आहे. मला त्याच्यासोबतच रहायचे आहे. ते ऐकून तिच्या दुसऱ्या पतीला काय करावे समजेना त्याने तिला खूप समजावले. पण ती ऐकली नाही. आणि त्याच्याकडे आपल्या पतीकडे जाण्याचा हट्ट करु लागली.त्यानंतर दोन्ही परिवारांमध्ये जोरदार वाजले. हे प्रकरण शेवटी पोलिसांकडे गेले.

महिलेच्या नव्या पतीने तिच्या पहिल्य़ा पतीवर आरोप लावले की, हिचे माझ्याशी लग्न लावून देण्याच्या बदल्यात यांनी माझ्याकडून तीस हजार रुपये घेतले आहेत. आणि आता ती मला माझ्या पहिल्या पतीकडे जायचे असे म्हणते. पोलिस सध्या दोघांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !