धनत्रयोदशी दिवशी चुकूनही करू नका या गोष्टींची खरेदी, येईल अठराविश्व् दारिद्रय आणि या वस्तू खरेदी केल्या तर होईल भरभराट !

2495

सगळ्यांचाच आवडता सन म्हणजेच दिवाळी. नवीन कपडे गोड मिठाई, चकल्या, शंकरपाळ्या, करंज्या लाडू यांसारख्या चमचमीत फराळ या सर्वच गोष्टींसाठी दिवाळीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळीतील प्रत्येक सणांचे महत्त्व हे वेगळे असते. अशातच दिवाळीची सुरुवात होणारा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. या दिवशी पैशांची पूजा केल्यास वर्षभर घरात पैशांची कथा देवी लक्ष्मीची भरभराट होते असे म्हटले जाते.

या दिवशी देवांचे वैद्य आणि औषधांची देवता धन्वंतरी यांची जयंती सुद्धा असते. त्यामुळे देवी लक्ष्मी सोबतच या दिवशी धन्वंतरी यांची सुद्धा पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर लोक सोने, चांदी, भांडी किंवा वेगवेगळे अलंकार यांसारख्या गोष्टींची खरेदी करतात.

पण नक्की कुठल्या गोष्टी शुभ असतात व कुठल्या गोष्टी अशुभ हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी केली पाहिजे व कोणत्या गोष्टींची खरेदी करू नये हे सांगणार आहोत.
धनत्रयोदशी च्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करावी.

धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते त्यामुळे त्या दिवशी देवी लक्ष्मीची किंवा गणपतीची मूर्ती विकत घ्यावी. यामुळे तुम्हाला सौभाग्य सुख आणि शुभता लाभते. विशेष करून देवी लक्ष्मीद्वारे पैशांचा आशीर्वाद देणारी देवीची मूर्ती खरेदी केल्यास ती उपयुक्त ठरते.

धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टी आवश्य खरेदी करा –
चांदी – धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीचे नाणे किंवा अलंकार खरेदी करणे शुभ असते या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करताना या वस्तूंची सुद्धा पूजा करावी.

पितळ – समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते त्यावेळेस त्यांच्या हातात पितळेच्या कलशात अमृत होते. धन्वंतरी यांना पितळ भरपूर प्रिय आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेच्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते.
झाडू – धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू आठवणीने खरेदी करा. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. यामुळे दारिद्र्य जाऊन घराची भरभराट होते त्या बरोबरच घरात सकारात्मकता येते.

मातीचे दिवे – दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी मातीचे दिवे खरेदी करावेत दिव्यांवीना दिवाळी अपुरी असते. बाजारात मातीचे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत जे आपल्या खिशाला परवडणारे देखील असतात.

धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही खरेदी करू नका –
1. लोखंडाची वस्तू – लोखंड हे शनि देवाचे प्रतीक असल्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाची वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते.

2. स्टील किंवा एल्युमिनियम ची भांडी – धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही स्टील किंवा ॲल्युमिनियमची भांडी खरेदी करू नयेत. ही भांडी धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्यास ते अशुभ मानले जाते कारण स्टील किंवा एल्युमिनियम राहु चे प्रतीक आहे. राहु मुळे दुर्भाग्य नशिबी येते.

3. प्लास्टिक काच किंवा मातीची भांडी – धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही काच प्लास्टिक किंवा मातीची भांडी खरेदी करू नयेत हे अशुभतेचे प्रतीक मानले जाते.

4. काळ्या रंगाची वस्तू – इतर गोष्टींप्रमाणेच धनत्रयोदशीच्या दिवशी रंगाने देखील महत्त्व असते. या दिवशी काळा रंगाची वस्तू खरेदी करणे वर्ज आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी भेसळयुक्त पदार्थांची किंवा वस्तूंची खरेदी करणे टाळा या दिवशी शुद्ध वस्तू किंवा पदार्थ खरेदी केला जाईल याची काळजी घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद.