Headlines

भाऊबीज का साजरी केली जाते ? आणि भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाच्या हातात गोप का बांधते ? जाणून घ्या !

भावा बहिणींच्या नात्यासाठी ‘रक्षाबंधन’ आणि ‘भाऊबीज’ हे दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात. तसे पाहायला गेले तर यांना त्यासाठी कुठलाही खास दिवस असण्याची गरज नाही. मात्र तरीही या दोन सणांना भाऊ बहीण एकत्र येऊन एकमेकांसोबत कायम राहण्याचे वचन देतात. दिवाळीतील भाऊबीज ही विशेष महत्त्वाची. कारण दिवाळीमुळे आधीच इतरत्र आनंदाचे सणासुदीचे वातावरण असते. अशातच भाऊबीजेला भाऊ बहीण एकत्र येऊन हा सण साजरा करतात. भाऊबीजेचा सण भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये साजरा केला जातो.

भाऊबीज केव्हा साजरी केली जाते? दिवाळीच्या सणात दिवाळी नंतर म्हणजेच हिंदू महिन्यानुसार कार्तिक शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवशी भाऊबीज येते.  भाऊबीज हा सण भावा-बहिणीच्या बंधनाचा सन्मान करतो. हा भावा बहिणींच्या प्रेमळ नात्यांचा सन्मान करणारा सण आहे.

या दिवशी बहीण तिच्या भावाच्या निरोगी आयुष्यासाठी, स्वास्थ्य आरोग्यासाठी, सुखसमाधानासाठी आणि सुरक्षित जीवनासाठी प्रार्थना करते. तर या बदली भाऊ त्याच्या बहिणीला प्रेम आणि तिचे संरक्षण करण्याच्या वचनाचे प्रतीक म्हणून एक भेटवस्तू देतो. भावा-बहिणीच्या नात्यांचा हा सण संपूर्ण परिवार एकत्र येऊन साजरा करतो संपूर्ण परिवार एकत्र येऊन व अन्य स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतो.

भाऊबीज का साजरी केली जाते ? – भाऊबीज संबंधी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. यामध्ये विशेषतः असे सांगितले जाते की या दिवशी मृत्यूची देवता यम त्याच्या बहिणीला म्हणजेच यामीला भेटायला गेला होता. यम यामीकडे येताच तिने त्याची आरती करून आणि त्याला हार घालून त्याचे स्वागत केले. त्याच्या माथ्यावर टिळा लावला आणि त्याला विशेष भोजन खाऊ घातले. या बदल्यात तिला एक भेटवस्तू दिली आणि तो दिवस यापुढे बहिणी त्यांच्या भावाला ओवाळून त्यांना टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून साजरा करतील असे वरदान दिले.

यामुळेच या दिवसाला यमद्वितीया किंवा यामादविथिया असेही म्हटले जाते. या पाठी अजून एक दंतकथा आहे ती म्हणजे राक्षसांचा राजा नारकसूराचा वध केल्यानंतर भगवान कृष्ण त्यांची बहिण सुभद्रा कडे गेले त्यावेळी तिने मिठाई, हार ,आरती आणि टिळा लावून भगवान श्रीकृष्णांचे स्वागत केले होते.

भाऊबीजेचा सण कोण साजरा करतात? – भाऊबीज हा एक हिंदू सण आहे. शिवाय दिवाळीच्या चार दिवसाच्या सणांपैकी हा एक महत्त्वाचा सण आहे. संपूर्ण भारतात विशेषतः हिंदुधर्मीय लोक साजरे करतात. हा सण भरपूर उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात या सणाला भाऊ बीज तर पश्चिम बंगाल मध्ये भाई फोंटा म्हणून साजरे केले जाते.

भाऊबीज कशी साजरी करतात ? – भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला विशेष भोजनासाठी तिच्या घरी आमंत्रित करते. या दिवशीच्या भोजनात आवडीचे सर्व पदार्थ तयार करते. बहिण तिच्या भावाच्या डोक्यावर कुंकू आणि तांदळाचा टिळा लावते आणि त्याला गोड मिठाई खाऊ घालते. त्याच्या डाव्या हातात गोप / करगोटा बांधून गंध अक्षता आणि फुलांवर त्याला ओवाळते.

तसेच त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीचे आयुष्यभर संरक्षण करेल असे वचन देतो आणि त्या बदल्यात तिला एक उत्तम भेटवस्तू देतो. ज्या स्त्रियांना भाऊ नसतो किंवा ज्यांचा भाऊ खूप दूर राहत असेल अशा स्त्रिया त्या दिवशी चंद्राला ओवाळून त्याची प्रार्थना करतात.

महाराष्ट्र गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये या सणाला भाऊबीज या नावानेही ओळखले जाते या दिवशी बहीण भावामध्ये भरपूर उत्साह असल्याचे दिसून येते. या दिवशी केवळ भाऊच नव्हे तर बहिणदेखील भावाला भेटवस्तू देते. या दिवशी जवळील नातेवाईक मित्रांना घरी आमंत्रित केले जाते. महाराष्ट्रात विशेषता या दिवशी बासुंदी पुरीचा बेत असतो.

भाऊबीजेच्या दिवशी बहिण भावाच्या हातात गोप / करगोटा का बांधते? भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाच्या हातात गोप / करगोटा बांधण्याची प्रथा आहे. या पाठी धार्मिक तसेच वैज्ञानिक बाजूसुद्धा आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी किंवा नवीन वस्तू खरेदी केल्यावर आपण हातात गोप / करगोटा बांधतो. या कलावा आपल्या आयुष्यात सुख समाधान आणतो. गोप / करगोटाला रक्षा तसेच विश्वासाचे प्रतीक मानले जाते. ही प्रथा बऱ्याच खेडेगावातील भागात पाळली जाते परंतु आजकाल काही भागात हातात करगोटा बांधण्याची पद्धत पाळली जात नाही. 

धर्म ग्रंथानुसार गोप बांधल्यामुळे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश आणि श्रीदेवी लक्ष्मी, पार्वती, सरस्वती यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते. दानवीर राजा बलीच्या अमरते साठी भगवान श्रीविष्णु घेतलेल्या वामन अवताराने राजा बलिच्या मनगटात रक्षासूत्र बांधले होते तेव्हापासून ही प्रथा चालू झाली आहे.

आरोग्यासाठी उत्तम – वैज्ञानिक दृष्ट्या हातात गोप / करगोटा बांधणे आरोग्यासाठी उत्तम असते. यामुळे वात, पित्त आणि कफ यांपासून शरीर संतुलन बनवते. शास्त्रानुसार पुरुषांनी आणि अविवाहित मुलींनी डाव्या हातात करगोटा बांधावा तर विवाहित स्त्रियांनी उजव्या हातात कलावा बांधावा. करगोटा बांधते वेळी त्या हाताची मुठ बंद करावी आणि दुसरा हात डोक्यावर ठेवावा. मनोवैज्ञानिकांच्या मते हातात करगोटा असल्यामुळे आपल्या परमात्मा द्वारे आपली रक्षा होते असा आभास होतो. यामुळे मनात शांती आणि आत्मबळ वाढते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे.